लिपस्टिक लावण्यापूर्वी 'या' गोष्टींची काळजी घ्या.

लिपस्टिक लावण्यापूर्वी मूलभूत गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या ओठांची त्वचा आपल्या शरीरावरील त्वचेपेक्षा खूपच पातळ असते. त्यामुळे लिपस्टिक लावण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्या...

Jun 14,2023

ताजे लोणी लावावे

ओठ कोरडे पडल्यास त्यावर ताजे लोणी लावावे त्यामुळे ओठांना ओलावा मिळून ओठ मुलायम बनतात.

ओठ दाताने कुरतडण्याची...

अनेकांना ओठ दाताने कुरतडण्याची सवय असते; त्यामुळे ओठांच्या त्वचेला इजा होते. ओठांचे पापुद्रे निघतात, ओठांना भेगा पडतात, त्वचा दबली गेल्यामुळे त्यातून रक्तही येते. अशावेळी ग्लॉसी लिपस्टिक वापरून ओठांना ओलावा मिळवता येतो, तसेच पारदर्शी रंगाच्या लिपबामचाही वापर करता येतो.

ब्रश ओठांवरून फिरवावा...

ब्रश करताना एक दोनवेळा ब्रश ओठांवरून फिरवावा. त्यामुळे ओठांवरील मृत त्वचा निघून जाते. लोणी आणि मीठ एकत्र करून ओठांना मसाज केल्यासही ओठांवरील मृत त्वचा निघून जाते.

व्हॅससिन आणि लिंबाचा रस...

कोरड्या पडणार्‍या ओठांसाठी रात्री झोपताना व्हॅससिन आणि लिंबाचा रस एकत्र करून लावावा.

ओठांचा काळेपणा दूर...

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी कच्च्या दुधामध्ये केसर घालून ते ओठांना चोळावे. त्यामुळे ओठांचा काळेपणा कमी होऊन ओठ चमकदार दिसतील, तसेच डाळींबाची साल आणि डाळिंबाच्या दाण्यांचा रस ओठांवर चोळून लावल्यास ओठांचा रंग उजळण्यास मदत होते.

ओठांना मसाज करून...

शेंगदाण्याच्या तेलाने ओठांना मसाज करून नंतर ओठ सुती कापडाने पुसून घेतल्यास नरम पडतात.

ओठांना व्हॅसलिन लावून...

लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना व्हॅसलिन लावून त्यावर लिपस्टिक लावल्यास ती जास्त वेळ राहते. ओठांना लावलेली लिपस्टिक जास्त वेळ टिकावी म्हणून ती फ्रीजमध्ये ठेवावी.

लिपस्टिक लावण्यापूर्वी...

लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर टाल्कम पावडरचा थर दिल्यास लिपस्टिक जास्त वेळ टिकून राहते.

रात्री झोपताना...

रात्री झोपताना लिपस्टिक स्वच्छ धुवून त्यावर लिप बाम किंवा तूप लावावे.

गडद लिपस्टिक लावल्यावर...

गडद लिपस्टिक लावल्यावर पेपर नॅपकिन किंवा रूमाल ओठांच्या मध्ये ठेवून त्यावर ओठांनी दाब द्यावा. त्यामुळे जास्तीची लिपस्टिक टिपली जाऊन ती आजूबाजूला पसरत नाही.

VIEW ALL

Read Next Story