तुम्ही जगात कुठेही जन्माला आलात, पण तुम्ही ज्यू असाल तर तुम्हाला इस्रायलचं नागरिक मानलं जातं.
किडनी दान करण्यात इस्त्रायल देश सर्वात पुढे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, 2020 मध्ये जिवंतपणी किडनी दान करणाऱ्यांमध्ये इस्त्रायल पहिल्या क्रमांकावर होता.
इस्त्रायलमध्ये हजारोंच्या संख्येने देवाला पत्र लिहिली जातात. यासाठी पोस्ट सेवेत एक वेगळं खातंच आहे. ही पत्रं खुली असतात. जेरुसलेमच्या जुन्या शहरातील वेस्टर्न वॉलमध्ये ही पत्रं ठेवतात.
इस्त्रायल हा इतका छोटा देश आहे की, तुम्ही फक्त 2 तास चालत सीमा ओलांडू शकता. तसंच तुम्ही 2 तास धावत पूर्वेकडून पश्चिमेला पोहोचू शकता. उत्तर ते दक्षिणेपर्यंत प्रवास करण्यासाठी 9 दिवस लागतात.
इस्त्रायलकडे लिखीत राज्यघटना नाही. जगात असे तीनच देश असून इस्त्रायल त्यापैकी एक आहे. न्यूझीलंड आणि युके यांच्याकडे लिखीत राज्यघटना नाही.
इस्त्रायलमध्ये चांगल्या कृत्यांचा दिवस साजरा केला जातो. 2007 मध्ये महिला उद्योजिका शॅरी अॅरिसन यांनी हा दिवस सुरु केला होता. 1.5 मिलियन स्वयंसेवक यामध्ये सहभागी होतात.
इस्त्रायलमध्ये पुनर्वापर होणारी सर्वात जुनी स्मशानभूमी आहे. The Mount of Olives गेल्या 3 हजार वर्षांपासून वापरात आहे. या स्मशानभूमीत 1 लाख 50 हजार कबरी आहेत. जुन्या काळात येथे ऑलिव्हची झाडं उगवत असल्याने हे नाव देण्यात आलं आहे.
इस्त्रायलमध्ये दोन प्रकारचे McDonald's आहेत. एक नेहमीप्रमाणे लाल रंगाचं McDonald आहे. तर दुसरं निळ्या रंगाचं आहे जिथे यहुदी धर्मातील आहारासंबंधी नियमांच्या कठोर नियमाचं पालन करणारं अन्न दिलं जातं.