विवाहित असूनही सिंगल लाइफ जगतात कपल्स
सेपरेशन मॅरेज किंवा विकेंड मॅरेज ही एक वेगळीच कॉन्सेप्ट सध्या प्रसिद्ध होत आहे. हे लग्न म्हणजे विवाहित असण्याचा आणि एकटं राहण्याचा कंबाइंड बेनिफिटं असणार आहे.
एका खाजगी न्यूज चॅनलला जपानी जोडप्याने आपल्या लग्नाची गोष्ट सांगितली. हिमोमी टाकेडा ही एक फिटनेस ट्रेनर आणि जिम मॅनेजर आहे.
तर तिचा नवरा हिदेकाजू एक बिझनेस अॅडव्हायजर आहे. त्यामुळे त्याचा जास्ता जास्त वेळा हा कॉम्प्युटरसमोर जातो. दोघांची लाइफस्टाइल खूप वेगळी आहे. पण त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे.
एकमेकांच्या करिअरच्या सन्मान करत आम्ही एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही. ते दोघे लग्न करुनदेखील वेगळे राहतात.
हिदेकाजू म्हणाला की, तो कधी तरी पत्नीच्या घरी रात्रभर थांबतो. माझं करिअर माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. पहिल्या लग्नात माझ्या बिझी असल्याने पत्नी कायम नाराज असायची. त्या लग्नातून लक्षात आलं की महिलांनी आर्थिकदृष्ट्या खंबीर असायला हवं.
हिरोमी म्हणते की, जर माझ्या पती घरी असेल तर मला काही गोष्टी करताना अडचणी येतील. ज्यामुळे मला सतत तणाव जाणवेल. त्यामुळे Separation marriage मुळे आम्ही दोघेही तणावमुक्त राहतो.
या दोघांना एक मुलही आहे जे आईसोबत राहतं. ते एकत्र आठवड्यातून 2 ते 3 वेळा भेटतात. खास करुन हिरोमीला मुलाचा सांभाळ करायचा असेल तेव्हा.
या दोघांच्या शेजारच्यांना यांचा घटस्फोट झाला आहे असं वाटतं. पण या दोघांचं मते लग्नानंतर सोबतच राहणं गरजेचं नाही. शिवाय या लग्नाने आम्हाला सुरक्षित वाटतं.