Pan America Highway हा जगातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे. संपूर्ण अमेरिकेत या महामार्गाचं जाळ असून, त्याची लांबी 30 हजार किलोमीटर इतकी आहे.
साधारण 19000 मैल इतकं अंतर असणाऱ्या या महामार्गाची नोंद गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली आहे.
जागतिक विक्रमांच्या यादीत करण्यात आलेल्या नोंदीनुसार हा जगातील सर्वात मोठा ‘मोटरेबल रोड (Motorable Road)’ आहे.
विविध टप्प्यांमध्ये हा महामार्ग तयार करण्यात आला आहे. अमेरिकेच्या अंतर्गत भागात एक महामार्ग असावा या हेतूनं उत्तर, मध्य आणि दक्षिण अमेरिकेला जोडणारा हा रस्ता तयार करण्यात आला.
पॅन अमेरिकन महामार्गाचा उत्तर भाग नॉर्थ पॅन अमेरिकन हायवे या नावानं ओळखला जातो. कॅनडा, युएसए, मेक्सिको, ग्वाटेमाला, अल साल्वाडोर, होंडुरस, निकारागुआ, कोस्टा रिका, पनामा या देशांतून हा रस्ता जातो.
साऊथ पॅन अमेरिकन हायवे पाच देशांमधून म्हणजेच कोलंबिया, इक्वेडोर, पेरू, चिली, अर्जेंटीना या देशांमधून जातो. महामार्ग बोलिविया, ब्राझील, प्राग, उरुग्वे या दक्षिण अमेरिकी देशांनाही जोडलेला आहे.
भौगोलिक परिस्थितीमध्ये मोठ्या फरकाच्या प्रदेशातून हा महामार्ग जातो. काही भागांत तो घनदाट अरण्यांतून जातो, तर कुठे निर्मनुष्य वाळवंटातून जातो. कुठे टुंड्रा प्रदेशांतून जातो तर, कुठे त्याविरुद्ध हवामानाच्या प्रदेशात नेतो.
हा संपूर्ण महामार्ग इतका मोठा आहे, की त्यावरून प्रवास करण्याचा नेमका कालावधी आणि त्यासाठीच्या खर्चाचा अंदाज लावण्यात आला नाहीये.
साधारण, जर दिवशी 500 किमी इतकं अंतर पूर्ण केल्यास हा प्रवास 60 दिवसांमध्ये पूर्ण केला जाऊ शकतो.
कालोरस सांतांमारिया नावाच्या एका सायकलपटूनं हा रस्ता 117 दिवसांमध्ये ओलांडला होता. या विक्रमाची जागतिक स्तरावरही नोंद करण्यात आली आहे.