UK PM ऑफिसमधील टेबलवरील मूर्तीबद्दल सुनक यांनी केला खुलासा

प्रभू रामचंद्र, हिंदू धर्मातील शास्त्र आणि दिवाळीबद्दलही ऋषी सुनक यांनी भाष्य करताना काय म्हटलंय पाहूयात...

Swapnil Ghangale
Aug 16,2023

रामकथेच्या कार्यक्रमाला हजेरी

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंगळवारी अध्यात्मिक गुरु मोरारी बापू यांच्या रामकथेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.

'जय श्री राम'ची घोषणा

मोरारी बापू यांच्या रामकथेचा कार्यक्रम केम्ब्रिज विद्यापीठामध्ये पार पडला. सुनक यांनी 'जय श्री राम' अशी घोषणा देत पुष्पांजली सुद्धा अर्पण केली.

ब्रिटीश आणि हिंदू असल्याचा अभिमान

सुनक यांनी आपल्याला ब्रिटीश आणि हिंदू असल्याचा अभिमान आहे असंही सांगितलं.

मी हिंदू म्हणून सहभागी झालो आहे

"मी इथे पंतप्रधान म्हणून नाही तर हिंदू म्हणून सहभागी होण्यासाठी आलो आहे," असं ऋषी सुनक म्हणाले.

धार्मिक आस्था फार खासगी बाब

"माझ्यासाठी धार्मिक आस्था फार खासगी बाब आहे. आस्था मला आयुष्यातील प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन करते," असंही ऋषी सुनक यांनी म्हटलं.

दिवाळीनिमित्त दिवे लावताना विशेष वाटायचं

यावेळेस ऋषी सुनक यांनी जुनी आठवण सांगताना, "मी जेव्हा चान्सलर होतो तेव्हा 11 डाउनिंग स्ट्रीटवर दिवाळीनिमित्त दिवे लावताना फार अद्भुत आणि विशेष वाटायचं," असंही म्हटलं.

टेबलवर गणरायाची मूर्ती

"मला अभिमान आहे की 10 डाऊन स्ट्रीटवरील माझ्या टेबलवर गणरायाची सोनेरी मूर्ती आहे," असंही ऋषी सुनक म्हणाले. चान्सलर असल्यापासून हा गणपती आपल्या टेबलवर असतो. कार्यालयात गणपती असणं शुभ असतं असं याबद्दल बोलताना सुनक यांनी सांगितलेलं.

अनेकदा मंदिरात जायचो

साऊथ हॅम्पटणमधील बालपणाबद्दल बोलताना घराच्या शेजारीच असलेल्या मंदिरामध्ये मी भाऊ-बहिणींबरोबर अनेकदा जायचो, असं ऋषी सुनक म्हणाले.

मी प्रसादही वाटायचो

मी तिथे माझ्या कुटुंबाबरोबर हवन, पूजा, आरतीसाठी जायचो. अनेकदा प्रसादही वाटायचो, असंही ऋषी सुनक म्हणाले.

राम प्रेरणास्त्रोत

माझ्यासाठी भगवान राम हे आयुष्यातील आव्हानांचा सामना करताना प्रेरणास्त्रोत आहेत आणि कायमच राहतील, असंही ब्रिटीश पंतप्रधानांनी म्हटलं.

हिंदू शास्त्रांप्रमाणे काम करेन अशी अपेक्षा

आपल्या (हिंदू) शास्त्रांमध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणेच मी मोरारी बापूंच्या आशिर्वादाने काम करेन, असा विश्वास ऋषी सुनक यांनी व्यक्त केला.

VIEW ALL

Read Next Story