सूर्य किरणे पृथ्वीवर पोहोचायला साधारणपणे 8 मिनिट ते 8 मिनिटे 40 सेकंद इतका वेळ लागतो.
सूर्याचे पृथ्वीपासून अंतर हे 150,000,000 किलोमीटर इतके आहे.
सूर्यप्रकाश समुद्राच्या तळाशी जाण्यासाठी 1,000 मीटर प्रवास करावा लागतो.
सूर्यप्रकाश योग्य परिस्थितीत समुद्रात सुमारे 1,000 मीटर खोलीपर्यंत पोहचतात.
खोली आणि प्रकाश पातळीच्या आधारावर महासागर तीन झोनमध्ये विभागलेला आहे.
समुद्राच्या 200 मीटरच्या वरच्या भागाला युफोटिक किंवा "सूर्यप्रकाश" झोन म्हणतात.
या झोनमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश पोहचतो. यापलीकडे सूर्यप्रकाश हळूहळू मंद होत जातो.