जगभरात बेडकांच्या 6 हजार प्रजाती आहेत. ज्यातील 380 प्रजाती भारतात आढळतात.
बेडकांची अशी एक प्रजाती आहे. जी एकावेळी मिनिटाभरात 10 जणांना मारु शकते.
या बेडकात इतकं विष असतं की त्याच्या स्पर्शाने मानवाचा मृत्यू होऊ शकतो.
या बेडकाचं नाव गोल्डन पॉयझन फ्रॉग असे आहे. हा दिसायला जितका सुंदर आहे, तितकाच विषारी आहे.
हा बेडूक जगातील सर्वात विषारी बेडूक मानला जातो.
हा बेडूक कोलंबियाच्या वर्षावनांमध्ये सापडत असून तो आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
कोलंबियाचे लोक याचा उपयोग ह्यार बनवण्यासाठी करतात.
हा बेडूक हलका पिवळा रंगाचा किंवा गडद सोनेरी रंगाचा असू शकतो.
सोनेरी रंगामुळे याला गोल्डन पॉयजन फ्रॉग असे म्हणतात.