सगळे ग्रह गोलच का असतात? ग्रहांचा आकार पाण्याच्या थेंबासारखा का नसतो?

Swapnil Ghangale
Sep 02,2024

ग्रहांचा आकार गोल का असतो?

जवळपास सर्वच ग्रहांचा आकार गोल का असतो? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

पाण्याच्या थेंबाचा आकार का नसतो?

म्हणजे पाण्याचा थेंब असतो त्याप्रमाणे एका बाजूला निमुळता आणि दुसरीकडे गोलाकार आकार ग्रहांना का नसतो?

नासानेच सांगितलं कारण..

सगळे ग्रह गोल का असतात याचं कारण अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाने सांगितलं आहे.

एकच कारण...

सगळे ग्रह गोल असण्याचं एकमेव कारण हे गुरुत्वाकर्षण हे आहे.

ग्रहाचं गुरुत्वाकर्षण...

प्रत्येक ग्रहाचं गुरुत्वाकर्षण ग्रहाच्या बाहेरील भागास आतल्या बाजूस खेचत असतं. आपण सायकलच्या चाकाला स्पोक्स लावण्यामागील तर्क आणि हे तर्क सारखं आहे.

...म्हणून गोल आकार मिळतो पण...

याच कारणामुळे सगळीकडून ग्रहाचा पृष्ठभाग केंद्राकडे खेचला जातो आणि ग्रहाला गोल आकार मिळतो. मात्र सर्व ग्रह पूर्णपणे अगदी परफेक्ट सर्कल नसतात.

सर्वाधिक गोलाकार ग्रह

आपल्या सौर्यमालेमध्ये गुरु आणि शनी हे सर्वाधिक गोलाकार ग्रह आहेत.

सर्वच ग्रह फुगलेले

पृथ्वीबरोबरच इतर ग्रह हे विषुववृत्तीय भागात थोडे बाहेरच्या बाजूला फुगलेले असतात.

थेंबाला मिळणारा आकार

पाण्याच्या थेंबाला मिळणारा आकार हा सुद्धा गुरुत्वाकर्षणामुळेच मिळतो. जमीनीकडे पडणारा भाग हा गोलाकार तर वरच्या बाजूला भाग हा निमूळता असतो.

...म्हणून पृथ्वी गोल आहे

याच कारणामुळे पृथ्वी सुद्धा पाण्याच्या थेंबाच्या आकाराची नसून गोल आहे.

VIEW ALL

Read Next Story