गर्लफ्रेंड दिवसातून तीन वेळा खात होती 'ही' एकच गोष्ट; वैतागून प्रियकराने केला ब्रेकअप

Shivraj Yadav
Oct 11,2024

अफेअर, व्यसन, फसवणूक या कारणांमुळ ब्रेकअप होत असल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण हे प्रकरण थोडं भलतंच आहे.

आपली प्रेयसी रोज एकच पदार्थ खात असल्याने प्रियकराने प्रेयसीसह ब्रेकअप केला.

ब्रेकफास्ट, लंच किंवा डिनर असो, प्रेयसी एकाच प्रकारचा डाएट करत होती. यामुळे वैतागलेल्या प्रियकराने तिच्यापासून अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला.

आपण ज्या तरुणीबद्दल बोलत आहोत ती फिटनेस इंफ्लूएन्सर आहे आणि तिचं नाव Rosana Ferreira आहे.

रोसाना आपला फिगर मेंटेन ठेवण्यासाठी असं करते आणि आपल्या जेवणात हाय-प्रोटीन डाएटचा समावेश करते.

तिचे सोशल मीडियावर जवळपास 1.5 लाख फॉलोअर्स आहेत आणि त्यातून चांगली कमाईही होते. अशात ती तडजोड करु शकत नाही.

रोसाना आपल्या डाएटमध्ये फक्त अंड खाते. दिवसातून तिन्ही वेळा ती फक्त अंड्याचं सेवन करते.

आपल्या या सवयीमुळे अनेकजण त्रस्त असून प्रियकराने तर ब्रेकअप केला आहे असं रोसानाने सांगितलं आहे.

VIEW ALL

Read Next Story