जन्म ते मृत्यूपर्यंतचा प्रवास कॅमेऱ्यात कैद

इयान यांनी हे फोटो काढण्याचं कारणही सांगितलं. जर मी रोज फोटो काढला, तर जन्म ते मृत्यूपर्यंतचा प्रवास पाहणं मनोरंजक असेल असं ते म्हणतात. जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत आपण हे फोटो काढू असं ते सांगतात.

Apr 04,2023

व्हिडीओ व्हायरल

युट्यूबला आल्यानंतर त्याने या प्रोजेक्टवर टाइम-लॅप्स फिल्म केली होती. ज्याचा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला.

11 डजारांहून अधिक फोटो

या फोटोंची संख्या आता 11 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. कॉरी सध्या जगभ्रमंती करत असून त्याने 60 हून अधिक देशांना भेट दिली आहे.

बाहेर असतानाही रोज मिळवायचे फोटो

कॉरीने सांगितलं की, जेव्हा मी माझ्या एखाद्या मित्राच्या घऱी असायचो तेव्हा वडील अर्ध्या रात्री तिथे फोटो काढण्यासाठी येत असत. शाळेच्या पिकनिकला असताना ते अनेकदा शिक्षकांना फोटो काढायला सांगायचे.

वाइन पिताना सुचली होती कल्पना

कॉरीचं म्हणणं आहे की, माझ्या वडिलांना एकदा वाइन पिताना माझा फोटो काढण्याची कल्पना सुचली होती. सुरुवातीला इयान यांना हे काही वर्षच शक्य आहे असं वाटलं होतं. पण जेव्हा त्यांनी हे काम सुरु केलं, तेव्हा ते असंच सुरु ठेवण्याचं ठरवलं.

1991 पासून सुरु आहे उपक्रम

1991 मध्ये कॉरीचा जन्म झाला होता. कॉरी जर घरापासून दूर असेल तर इयान अनेक तास प्रवास करत जात असत. आता मात्र मुलगा त्यांना सेल्फी पाठवतो.

31 वर्षांपासून इयान रोज काढतायत मुलाचा फोटो

इंग्लंडमध्ये राहणारे 66 वर्षीय इयान मॅकलिओड गेल्या 31 वर्षांपासून आपला मुलगा कॉरी मॅकलिओडचा रोज फोटो काढत आहेत.

VIEW ALL

Read Next Story