जगात असे 8 देश आहेत जिथे एकही मशीद नाही, हे देश कोणते पाहा....
जगात एकूण 200 हून अधिक देश आहेत आणि यापैकी बहुसंख्य देशांमध्ये मुस्लीम समाज वास्तव्यास आहे.
जगातील अनेक देशांमध्ये मुस्लीम असले तरी सर्वच देशांमध्ये जिथे मुस्लीम आहेत तिथे मशीद आहेच असं नाही.
मुस्लीम लोक असून एकही मशीद नसलेले जगात एकूण 8 देश आहेत. हे देश कोणते हे पाहूयात...
जगातील सर्वात लहान देशांपैकी एक असणारा देश म्हणजे मोनॅको. फ्रान्सच्या जवळ असणारा पश्चिम युरोपमधील या देशात एकही मशीद नाही.
एक हजाराहूनही कमी लोकसंख्या असणाऱ्या व्हॅटिकन सिटी देशामध्ये ख्रिश्चन धर्मगुरु म्हणजेच पोप राहतात. या देशाचं क्षेत्रफळ ११० एकर असून इथं एकही मशीद नाही.
उरुग्वे हा दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. या देशात एक हजाराहून अधिक मुस्लीम राहतात. मात्र या देशात एकही मशीद नाही.
साओ टोम आणि प्रिंसिपे येथे 1970 सालानंतर मुस्लीम लोक वास्तव्यासाठी येऊ लागले. मात्र 53 वर्षानंतरही या ठिकाणी एकही मशीद उभारण्यात आलेलं नाही.
इस्टोनिया उत्तर युरोपमधील एक छोटासा देश आहे. या देशामध्ये मुस्लीम लोकसंख्या दखल घेण्याइतकी असली तरी या ठिकाणी एकही मशीद नाही.
युगोस्लाव्हिया देशाचं विभाजन झाल्यानंतर स्लोवाकिया देशाची निर्मिती झाली. या देशामध्येही एकही मशीद नाही.
भूतानमध्ये मुस्लिमांची संख्या 5 ते 7 हजार इतकी आहे. मात्र या देशात एकही मशीद नाही.