अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय

दोन वेळा ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकणारा गिल हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

Oct 13,2023

आधी कोणी जिंकला पुरस्कार?

गिलच्या आधी भारताकडून ऋषभ पंत, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, श्रेयस अय्यर, विराट कोहली यांनी हा विशेष पुरस्कार जिंकला आहे.

कोण कोण होतं स्पर्धेत?

आयसीसीकडून शुभमन गिल, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि इंग्लंडचा डेव्हिड मलान यांना सप्टेंबरसाठी प्लेयर ऑफ द मंथसाठी नामांकन देण्यात आलं होतं.

शुभमनला का मिळाला पुरस्कार?

शुभमन गिलला ICC पुरुष क्रिकेट विश्वचषकापूर्वी अनेक एकदिवसीय सामन्यांमध्ये वर्चस्व गाजवल्यामुळे हा पुरस्कार त्याला मिळाला आहे.

सप्टेंबरमध्ये तुफान कामगिरी

शुभमनने गेल्या महिन्यात 80 च्या सरासरीने 480 धावा केल्या आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतकेही झळकावली होती.

डेंग्युमुळे खेळू शकला नाही सामने

डेंग्यूमुळे विश्वचषकाच्या गेल्या दोन सामन्यांत खेळू न शकलेला शुभमन पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.

पाकिस्ताविरुद्ध खेळण्याची शक्यता

गिल ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता पण पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.

VIEW ALL

Read Next Story