मोबाईल फोन हा आजच्या काळात प्रत्येकाची गरज बनला आहे. प्रत्येकजण कानाला मोबाईल लावलेला आपल्या दिसतो.
अनेकजण दिवसातला खूप वेळ फोनवर बोलण्यात घालवतात. पण फोनवर बोलण्यासाठी डाव्या, उजव्यापैकी कोणत्या कानाचा उपयोग करायचा हे माहिती आहे का?
बहुतेक लोक फक्त फोनवर बोलण्यासाठी उजव्या कानाचा वापर करतात. उजव्या कानाने फोन ऐकण्याचा थेट मेंदूवर परिणाम होतो, ज्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होऊ शकता, असे एका संशोधनात म्हटले आहे.
जेव्हा आपण फोनवर बोलण्यासाठी कानाचा वापर करतो तेव्हा त्यातून निघणाऱ्या रेडिएशनचा मेंदूवर जास्त परिणाम होतो. त्यामुळे फोनवर बोलताना डाव्या कानाचाही वापर करावा, असे म्हटले जाते.
फोन कॉलसाठी डावा कान किंवा उजवा कान वापरणे सुरक्षित आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत.
जेव्हा आपल्या पेशी फोनच्या संपर्कात येतात तेव्हा ते रक्त-मेंदूच्या अडथळ्याला हानी पोहोचवते, असे फिनलँड सायंटिस्ट आणि न्यूक्लियर सेफ्टी अथॉरिटीने केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे.
सुमारे 80 टक्के लोक फोनवर कॉल करताना उजव्या कानाचा वापर करतात, कारण आपल्या मेंदूची डावी बाजू अधिक सक्रिय असते, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.
फोनवर बोलत असताना एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत फोन बदलत राहणे तुमच्यासाठी आवश्यक आहे.
फोनवर बोलण्यासाठी नेहमी दोन्ही कान वापरणे हाच उत्तम पर्याय आहे.