प्लगमध्ये पाणी गेल्यास

गिझरच्या प्लगमध्ये पाणी गेल्यास प्लग बंद ठेवा. पाणी असताना प्लग सुरु केल्यास विजेचा झटका लागण्याची शक्यता असते.

Mar 08,2023

कंपनी कोणती?

स्थानिक इलेक्ट्रिशियनकडून घेतलेले हलक्या दर्जाचे गिझर लवकर खराब होतात. त्यामुळेच ब्रॅण्डेड कंपन्यांचेच गिझर घेण्यास प्राधान्य द्यावे.

गॅस गिझर वापरत असाल तर

गॅस गिझर वापरत असल्यास बाथरुमला व्हेंटीलेशन आवश्यक आहे. बाथरुम बंदिस्त नसावे यासंदर्भातील काळजी घ्यावी.

योग्य पद्धतीने वापर

गरम पाणी संपल्यानंतरच गिझर पुन्हा चालू करावा. पूर्ण पाणी संपेपर्यंत पुन्हा गिझर ऑन करु नये.

रेटिंग महत्त्वाचं

जास्त रेटिंग असलेले गिझर अधिक वीज वाचवतात. 5 स्टार रेटिंग असलेला गिझर 25 टक्क्यांपर्यंत वीज वाचवतो.

बाथरुमसाठी गिझर हवा असेल तर...

बाथरुमसाठी गिझर घेण्याचा विचार असेल तर 10 लीटर ते 35 लीटर क्षमतेचा गिझर उत्तम मानला जातो.

किचनसाठी गिझर घेणार असाल तर

तुम्ही किचनसाठी गिझर घेणार असाल तर 1 लीटर, 3 लीटर आणि 6 लीटर गिझरचा पर्याय उत्तम ठरतो.

शॉक फ्रूफ गिझरला प्राधान्य

गिझर घेतानाच तो शॉक फ्रूफ आहे की नाही तपासून घ्या. सामान्यपणे अशा गिझरमध्ये प्रेशर कंट्रोल फिचरही असतं.

लिकेज धोकादायक

गिझरमधून पाणी लिक होत असेल तर तातडीने त्याची सर्व्हिसिंग करुन घ्यावी.

गिझर किती सुरक्षित ते तपासा

तुम्ही गिझर खरेदी करत असाल तर तो नेमक्या कोणत्या गोष्टींपासून बनवण्यात आला आहे हे तपासून पाहा.

VIEW ALL

Read Next Story