गुगल 1 डिसेंबर 2023 पासून इनअॅक्टिव जीमेल अकाऊंट काढून टाकण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे युजर्सना मोठा धक्का बसण्याची शक्यता आ
हा निर्णय अशा युजर्ससाठी आहे ज्यांनी गेल्या दोन वर्षांत त्यांचे गुगल अकाऊंट वापरले नाही, ज्यात ईमेल, ड्राइव्ह फाइल्स, फोटो आणि कॉनॅक्टसह सर्व डेटा आहे.
एका घोषणेमध्ये, गुगलने सर्व जीमेल युजर्ससाठी तात्काळ अंतिम मुदत जारी केली आहे. गुगलने अलीकडेच त्याच्या इनअॅक्टिव जीमेल अकाऊंट धोरणाचे महत्त्वपूर्ण अपडेट जाहीर केले आहे.
पुढील महिन्यात असे अकाऊंट हटवले जाऊ शकतात. डिसेंबर 2023 मध्ये, गुगल किमान दोन वर्षांपासून इनअॅक्टिव जीमेल अकाऊंट हटवण्याची प्रक्रिया सुरू करेल.
इनअॅक्टिव जीमेल अकाऊंट बंद करण्याचा निर्णय जुन्या अकाऊंटच्या सायबर हल्ल्यांच्या वाढत्या असुरक्षिततेमुळे घेण्यात आला आहे.
जे नियमित Gmail, Docs, Calendar आणि Photos वापरतात त्यांना घाबरण्याची गरज नाही कारण अपडेटचा अॅक्टिव अकाऊंटवर परिणाम होणार नाही.
तुमचे गुगल अकाऊंट सेव्ह करण्यासाठी, तुम्हाला गुगल अकाऊंटमध्ये साइन इन करणे आवश्यक आहे. तुम्ही जीमेलमध्ये लॉग इन करून तुमचे गुगल अकाऊंट सुरु ठेवू शकता.