महिलेचं मृत्यूच्या 5 दिवस आधीच लग्न झालं होतं. बरेलीत ही घटना घडली असून, रुग्णालयात नेताना महिलेने जीव गमावला.
दरम्यान गिझर सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुम्हीदेखील सुरक्षित राहता.
गिझरला सुरक्षित ठेवण्यासाठी इंस्टॉलेशन करताना काही गोष्टींची काळजी घ्या. गिझरला प्रोफेशनल व्यक्तीकडूनच इंस्टॉल करुन घ्या. योग्य जागा आणि उंचीवर तो ठेवा.
गिझर सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीने दिलेल्या सूचनांचं पालन करा. ओव्हर लोडिंग आणि चुकीचा वापर थांबवा.
गिझर नेहमी सुरु ठेवू नका. असं केल्यास त्यातील गरम पाण्यामुळे दबाव निर्माण होतो आणि स्फोट होण्याची शक्यता असते.
गिझर सुरक्षित ठेवण्यासाठी वेगळ्या सर्किटचा वापर करा. योग्य वायरिंग आणि सर्किट असावं.
गिझरचा नियमित मेंटेनन्स करा. तसंच लीकेज आणि इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका.