7 लाखापेक्षा कमी किंमत, 31 किमी मायलेज; 'या' स्वस्त सेडानचा मार्केटमध्ये धुमाकूळ

ऑक्टोबर महिना कार निर्मात्यांसाठी फारच चांगला ठरला. दरम्यान दिवाळीमुळे कंपन्यांना फार अपेक्षा आहे. जवळपास प्रत्येक सेगमेंटमध्ये वाढ दिसत आहे.

सणांच्या सीझनमध्ये 18 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. जी गतवर्षी जवळपास 8.65 लाख युनिट होती. यावर्षी 10 लाख युनिट्सच्या विक्रीची आशा आहे.

सेडान सेगमेंटमध्ये कमी किंमत, चांगला मायलेज आणि स्पेस यामुळे पाच वाहनांची लोकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे.

Skoda Slavia

स्कोडा स्वालिया देशातील 5 वी सर्वाधिक विकली जाणारी सेडान ठरली आहे. या कारच्या विक्रीत 41 टक्के वाढ दिसली आहे. ऑक्टोबर महिन्यात एकूण 1943 युनिट्सची विक्री झाली आहे.

Hyundai Verna

Hyundai ने ऑक्टोबर महिन्यात आपली प्रसिद्ध सेडान Verna च्या एकूण 2313 युनिट्सची विक्री केली, जी गतवर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत 6 टक्के जास्त आहे.

Honda Amaze

होंडाची सर्वात स्वस्त सेडान कार Amaze च्या विक्रीत 47 टक्क्यांची घट दिसली आहे. पण यानंतरही ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. या कारच्या एकूण 2890 युनिट्सची विक्री झाली आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात हा आकडा 5443 होता.

Hyundai Aura

हुंडाईची स्वस्त सेडाना Aura च्या विक्रीत 4 टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे. कंपनीने एकूण 4096 युनिट्सची विक्री केली आहे.

Maruti Dzire

Maruti Dzire ने नेहमीप्रमाणे पहिला क्रमांक मिळवला आहे. कंपनीने एकूण 14 हजार 699 युनिट्सची विक्री केली आहे, जी गतवर्षीच्या 12,321 च्या तुलनेत 19 टक्के जास्त आहे.

VIEW ALL

Read Next Story