सुट्टीसाठी जाताना फ्रिज रिकामा करून तो बंद करून उघडाच ठेवावा.
फ्रिज लो लेवलवर ठेवू नका असं केल्यास कंप्रेसरवरील ताण वाढतो.
जिथं वीजपुरवठा मध्येच खंडीत होत असतो तिथं फ्रिज लावूच नये.
फ्रिज बिघडल्यास त्याला Local Parts लावू नका. असं केल्यास कंप्रेसरमध्ये स्फोट होण्याचा धोका संभवतो.
फ्रिजमध्ये जास्त बर्फ गोळा होऊन देऊ नका. यामुळं त्याचं तापमान वाढून स्फोट होण्याची भीती असते.
बऱ्याच काळापासून फ्रिज रिकामा असल्यास तो बंद करून नंतरच सुरु करावा.