Google Pay वरून हिस्ट्री हटवायची आहे?

Feb 26,2024


UPI पेमेंट सुरु झाल्याने ऑनलाइन व्यवहारांची प्रक्रिया सुलभ झाली आहे. पण काही लोक ॲपद्वारे काही व्यवहार करतात जे त्यांना लपवायचे आहेत.


जर तुम्ही अशा युजर्सपैकी एक असाल ज्यांना त्यांचा व्यवहाराची हिस्ट्री डिलीट करायची असेल, तर तुम्ही Google Pay वरून हिस्ट्री सहजपणे हटवू शकता.


जेव्हा तुम्ही एखाद्याला पैसे पाठवता तेव्हा त्याची वेळ, रक्कम, ट्रान्झिक्शन आयडी आणि इतर सर्व तपशील ॲपवर साठवले जातात. तुमच्याकडे पर्यायी पद्धत आहे ज्याद्वारे तुम्ही तुमची हिस्ट्री डिलीट करु शकता.


सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या फोनमध्ये Google Pay ॲप उघडा. यानंतर, तुम्हाला वरच्या बाजूला प्रोफाइल पिक्चर आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करा.


तिथे सेटिंग्जचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. येथे तुम्हाला Privacy and Security चा पर्याय मिळेल, त्यावर टॅप करा.


यानंतर ‘डेटा आणि पर्सनलायझेशन’ पर्यायावर क्लिक करा. गुगल अकाऊंट लिंकवर क्लिक केल्यानंतर, एक नवीन विंडो स्क्रीन उघडेल.


तिथे Payment Transactions and Activities चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा. तुम्ही खाली स्क्रोल केल्यास, तुम्हाला 'डिलीट' पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा.

VIEW ALL

Read Next Story