फक्त टेंशन नव्हे, तर 'या' क्षुल्लक कारणामुळं वाढतोय High BP चा धोका

Jul 01,2024

समस्या

तुम्हाला माहितीये का, रक्तदाबाची समस्या फक्त तणावानंच वाढत नाही. तर, त्यामागे आणखी काही गोष्टीसुद्धा तितक्याच कारणीभूत असतात.

सतर्क व्हा

तासन् तास फोनवर बोलत राहण्याची सवय असणाऱ्यांनी इथं सतर्क होण्याची गरज आहे. कारण, त्यांची हीच सवय या मंडळींचा घात करु शकते.

उच्च रक्तदाब

एका संशोधनातून समोर आलेल्या वृत्तानुसार जास्तीत जास्त वेळ मोबाईलचा वापर करणाऱ्यांना उच्च रक्तदाब अर्थात हाय बीपीच्या समस्येला सामोरं जावं लागतं.

रक्तदाब

निरीक्षणानुसार दर दिवशी 1 ते 3 तास फोन वापरणाऱ्यांचा रक्तदाब 13 टक्क्यांनी वाढतो. तर, 6 किंवा त्याहून अधिक तासांसाठी मोबाईल वापरणाऱ्यांना high bp चा धोका 25 टक्के अधिक असतो.

हृदयविकाराचा धोकानिरीक्षणानुसार दर दिवशी 1 ते 3 तास फोन वापरणाऱ्यांचा रक्तदाब 13 टक्क्यांनी वाढतो. तर, 6 किंवा त्याहून अधिक तासांसाठी मोबाईल वापरणाऱ्यांना high bp चा धोका 25 टक्के अधिक असतो.

रक्तदाब वाढलेल्या अनेकांनाच हृदयविकाराचा धोका अधिक असतो. उच्च रक्तदाबामुळे मानसिक तणाव, भीती आणि घाम फुटणं अशाही समस्या अनेकदा बळावतात.

नैराश्य

अनेकदा परिस्थिती इतकी बिघडते की, यामध्ये कैक मंडळी नैराश्याच्या गर्त छायेत झुंज देताना दिसतात. फक्त मोबाईल नव्हे, तर लॅपटॉपवर सर्वाधिक काळ काम केल्यामुळंही उच्च रक्तदाबाचा धोका आणखी वाढतो.

VIEW ALL

Read Next Story