ही एक 'रायडर युटिलिटी व्हेईक'ल असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. यासाठी याच्या नावात RUV चा वापर करण्यात आला आहे. ग्राहकांच्या रोजच्या गरजा लक्षात घेत ही स्कूटर तयार करण्यात आली आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटरला तीन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आलं आहे. ज्यामध्ये RUV 350i, RUV 350EX, RUV 350 Max यांचा समावेश आहे.
याचं बेस मॉडेल RUV 350i ची किंमत 1.10 लाख, मिड व्हेरियंट RUV 350 EX ची किंमत 1.25 लाख आणि RUV 350 Max ची किंमत 1.35 लाख ठरवण्यात आली आहे.
कंपनी पुढील महिन्यात देशभरातील 120 डिलरशीपच्या माध्यमातून यांची डिलिव्हरी करणार आहे. RUV 350 मध्ये कंपनीने 3.5kW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे, जी 165Nm चा टार्क जनरेट करते. हिचा टॉप स्पीड ताशी 75 किमी आहे.
3kWh क्षमतेचा लिथियम LFP बॅटरी पॅक असणाऱ्या या स्कूटरचं टॉप व्हेरियंट 120 किमीची ड्रायव्हिंग रेंज देईल. तसंच मिड आणि बेस व्हेरियंट 90 किमीच्या रेंजसह उपलब्ध आहेत.
RUV 350 ला कंपनीने मायक्रो-अलॉय ट्यूबलर फ्रेमवर तयार केलं आहे. याच्या फ्रंटला टेलोस्कोपिक फॉर्क आणि मागील बाजूला शॉर्क ऑब्जर्व्हर सस्पेंशन दिलं आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 16 इंचाचा व्हील आणि ट्यूबलेस टायर मिळतो. दोन्ही चाकात कंपनीने ड्रम ब्रेक्सचा वापर केला आहे.
यामध्ये 5 इंचाचा टीएफटी डिस्प्ले, क्रूज कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट, फॉल डिटेक्शन सिस्टम, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन आणि कॉल नोटिफिकेशनची सुविधा मिळते.
बाजारात BGauss RUV 350 ची स्पर्धा थेट ओला, टीव्हीएस, अथर आणि बजाज चेतक यासारख्या ब्रँडशी असेल.