OLA, Ather ला दणका! Bajaj ने लाँच केली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर

Jun 09,2024

देशातील प्रमुख दुचाकी निर्माता कंपनी बजाज ऑटोने आपल्या एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर बजाज चेतकच्या नव्या व्हेरियंटला लाँच केलं आहे.

कंपनीने या नव्या स्कूटरला Chetak 2901 असं नाव दिलं आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 95 हजार 998 पासून सुरु होते.

चेतकच्या नव्या व्हेरिटंयला एकूण 4 रंगात सादर करण्यात आलं आहे. यामध्ये लाल, पांढरा, काळा, पिवळा आणि निळ्या रंगाचा समावेश आहे.

लूक आणि डिझाईनच्या बाबतीत चेतक इतर मॉडेल्सप्रमाणेच आहे. पण कंपनीने काही फिचर्समध्ये बदल करत ती आणखी स्वस्त केली आहे.

नव्या Chetak 2901 इलेक्ट्रिक स्कूटर सीरिजमध्ये कंपनीने 2.88kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 123 किमीची रेंज देते असा कंपनीचा दावा आहे.

चेतकच्या अर्बन आणि प्रीमिअम व्हेरियंटच्या तुलनेत हिचा टॉप स्पीड ताशी 63 किमी आहे. याची बॅटरी चार्ज होण्यासाठी 6 तास लागतात.

कमी किंमतीत लाँच झालेली असतानाही या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटीसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

यासह ग्राहक TecPac ची निवड करु शकतात. या पॅकेजमध्ये हिल-होल्ड, रिव्हर्स मोड, स्पोर्ट्स मोड, इकॉनॉमी मोड, म्युझिक कंट्रोल, फॉलो मी होईल लाईट असे अनेक फिचर्स मिळतात.

सध्या भारतीय बाजारपेठेत बजाज चेतक एकमेव मॉ़डेल आहे, जी मेटलपासून तयार करण्यात आली आहे.

VIEW ALL

Read Next Story