रांची येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने युवा खेळाडूंच्या जोरावर विजय मिळवला.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
अशातच आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाने दुसरं स्थान मजबूत केलंय.
मात्र, मालिका विजयानंतर देखील टीम इंडियाच्या पदरी निराशा पहायला मिळाली. टीम इंडियाला अव्वल स्थान गाठता आलं नाही.
टीम इंडियाच्या गुणांची टक्केवारी 59.52 वरून 64.58 झाली आहे. तर अव्वल स्थानी असलेल्या न्यूझीलंडच्या खात्यात 75 गुणांची टक्केवारी आहे.
तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशने मजबूत आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर पाईंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन स्थानावर कायम रहावं लागेल.
यंदाच्या वर्षात टीम इंडिया तीन कसोटी मालिका खेळण्याची शक्यता आहे. त्याही टीम इंडियाला विजय मिळवावा लागेल.