वर्ल्ड कपच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा येथील सामन्यांकडे लागल्या आहेत.
वर्ल्ड कपच्या इतिहासात 'हे" 5 बॅट्समन कधीच शुन्यावर आऊट झाले नाहीत आणि त्यांनी सर्वाधिक स्कोअरदेखील बनवला आहे.
सनथ जयसुर्याच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये 1 हजार 165 रन्सचा रेकॉर्ड आहे.
विराट कोहली दुसऱ्या नंबरवर आहे. त्याने वर्ल्ड कपमध्ये 1 हजार 30 रन्स बनवले आहेत. येथे तो कधीच शुन्यावर आऊट झाला नाही.
कोहलीचा फॉर्म कायम राहिला तर तो यावेळेस जयसुर्याचा रेकॉर्ड तोडू शकतो.
वर्ल्ड कपमध्ये विवियन रिचर्ड यांनी शुन्यावर कधीच बाद न होता, 1013 रन्स बनवले आहेत.
डेव्हिड वॉर्नरने वर्ल्ड कपमध्ये 992 रन्स बनवले. दरवेळेस तो आपले खाते उघडतो. या यादीत तो चौथ्या स्थानी आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन कधीच शुन्यावर आऊट झाला नाही. त्याने वर्ल्ड कपमध्ये 987 रन्स बनवले.
या लिस्टमधील कोहली आणि वॉर्नर आजही खेळत आहेत. सर्वात कमी वयाचा असल्याने कोहलीला रेकॉर्ड्स बनविण्याची संधी आहे.