2023 च्या विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेची दुखापतीची समस्या वाढत आहेत.
त्यानिमित्ताने ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान दक्षिण आफ्रिकेला नवीन कर्णधाराची घोषणा करावी लागली आहे.
२०२३ चा विश्वचषक डोळ्यासमोर आहे , सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत आणि आपल्या खेळाडूंच्या फिटनेसचीही काळजी घेताना दिसत आहेत. टीम इंडिया, श्रीलंका आणि बांगलादेश हे संघ सध्या आशिया कप खेळत आहेत.
त्यादरम्यान ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेतही एकमिकांच्या विरुद्धच्या खेळात आहेत. पण या सगळ्यात साऊथ आफ्रिका संघाला अचानक आपला कर्णधार बदलावा लागला.
महत्त्वाच्या सामन्यापूर्वी कर्णधार टेंबा बावुमा स्नायूंच्या झालेल्या दुखापतीमुळे जखमी झालाय. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
2023 च्या विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या अनेक खेळाडूंना दुखापत झाल्याचं दिसतंय. यावेळी अनुभवी खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेंच्युरियनमधील चौथ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडला आहे.
बावुमाच्या अनुपस्थितीत, एडन मार्कराम चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करणार आहे .
दरम्यान याबाबत दक्षिण आफ्रिकेने स्पष्ट केलंय की, त्यांच्या कर्णधाराची दुखापत किरकोळ आहे.
दक्षिण आफ्रिकेला आशा आहे की कर्णधार टेंबा बावुमा लवकरच पुन्हा फलंदाजीला सुरुवात करेल.