भारतीय संघाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 च्या फायलनमध्ये प्रवेश केला आहे.
विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी-फायलनमध्ये शतकं झळकावली.
मोहम्मद शामीने 7 विकेट्स घेण्याचा पराक्रम करत न्यूझीलंडच्या फलंदाजीला सुरुंग लावले.
भारताने न्यूझीलंडला सेमी-फायलनमध्ये 70 धावांनी पराभूत करत चौथ्यांदा वर्ल्ड कपची फायनल गाठली.
श्रेयस अय्यरने या सामन्यामध्ये आक्रमक फलंदाजी करत 70 बॉलमध्ये 105 धावा केल्या.
अय्यरने या खेळीमध्ये 8 सिक्स आणि 4 चौकार लगावले. अय्यरने 64 धावा चौकार-षटकारामधून केल्या.
अय्यरने 8 सिक्स लगावत एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.
वर्ल्ड कपच्या कोणत्याही सामन्यामध्ये भारतीय फलंदाजाने सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम श्रेयसने स्वत:च्या नावावर केला.
श्रेयस हा वर्ल्ड कपच्या एका सामन्यात सर्वाधिक सिक्स लगावणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
श्रेयसने सौरव गांगुली आणि युवराज सिंगचा विक्रम मोडीत काढला आहे.
गांगुली आणि युवराजने प्रत्येकी 7 सिक्स लगावले होते.