19 नोव्हेंबरला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात world cup चा अंतिम सामना रंगणार आहे.

Nov 17,2023


आणि रिपोर्टसनुसार, जगप्रसिद्ध पॉप सिंगर दुआ लिपा ( Dua Lipa) वर्ल्ड कपच्या क्लोजिंग सेरेमनिमध्ये परफॉर्म करणार आहे.


गायिकेकडून अजून यावर शिक्कामोर्तब झालं नसलं तरीही, काही दिवसांपूर्वी एका इंटरव्ह्युदरम्यान क्रिकेटर शुभमन गिलनं तिला विचारलेल्या एका प्रश्नावरून चर्चांना उधाण आलं आहे.


शुभमननं विचारलं की तू वर्ल्ड कपच्या ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनिमध्ये तुझी कोणती गाणी गाशील ?


उत्तरादाखल दुआ म्हणाली, हा स्पोर्ट्स इवेंट असल्यानं ती 'फिजिकल' हे गाणं गाईल सोबतच 'वन किस' आणि नव्यानं आलेलं तिचं एखादं गाणं ती गाईल.


दुआच्या उत्तरानं आता बरेचजण असा तर्क लावत आहेत की दुआ वर्ल्ड कप इवेंट मध्ये परफॉर्म करू शकते.


शुभमनसोबतच के एल राहुलनंही तिला प्रश्न विचारला, तू कोणत्या क्रमांकाची जर्सी घालणं पसंत करशील? यावर ती म्हणाली की तिचा लकी नंबर 22 असल्यानं ती त्या क्रमांकाची जर्सी परिधान करणं पसंत करेल.


वर्ल्ड कपची फायनल मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे.

VIEW ALL

Read Next Story