'या' देशाला मिळाला युवराजसारखा घातक ऑलराऊंडर!
यंदा भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी झिम्बाब्वेमध्ये विश्वचषक पात्रता स्पर्धा खेळवली जात आहे. या पात्रता सामन्यात झिम्बाब्वे वर्ल्ड करसाठी क्वालिफाय करण्याची शक्यता आहे.
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज संघ फेव्हरिट मानले जात होते. मात्र, आता झिम्बाब्वे आणि नेदरलँड या दोन संघांनी कडवी टक्कर दिल्याचं पहायला मिळतंय.
विश्वचषक पात्रता फेरीत झिम्बाब्वेने आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले आहेत. जिथे संघ एकही सामना हरला नाही. या तिन्ही सामन्याच चमकला तो झिम्बाब्वेचा सुपरहिरो...
सिकंदर रझा हा झिम्बाब्वेसाठी सुपरहिरो ठरतोय. आपल्या अष्टपैलू कामगिरीने सिंकदर झिम्बाब्वेला वर्ल्ड कपमध्ये खेळवणार हे पक्कं मानलं जातंय.
सिकंदर रझा आपल्या संघासाठी केवळ बॅटनेच नव्हे तर चेंडूनेही अप्रतिम कामगिरी करतोय. सिकंदर रझाने आतापर्यंत दोन डावात 170 धावा केल्या आहेत. तर 22.50 च्या सरासरीने 6 विकेट्सही घेतल्या आहेत.
युवराज सिंगने 2011 च्या विश्वचषकात टीम इंडियासाठी अशीच काहीशी कामगिरी केली होती. ज्यामुळे टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकता आला. त्यामुळे आता सिंकदरच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागलंय.