टीम इंडियाचे माजी खेळाडू सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात.
आज आपण तेंडुलकर-गांगुलीच्या लेंकींच्या शिक्षणाबद्दल जाणून घेणार आहोत.
सचिनच्या लेकीचे नाव सारा आहे तर सौरभच्या लेकीचे नाव सना आहे.
साराने लंडन विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेतलंय.
साराची आई अंजली तेंडुलकर डॉक्टर आहे. ती सचिनपेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे.
शिक्षणानंतर सारा मॉडेलिंग आणि ग्लॅमर इंडस्ट्रीत आपलं नशिब आजमावत आहे.
साराने गेल्या काही दिवसात मॉडेलिंगचे प्रोजेक्ट केले. सोशल मीडियात ब्युटी प्रोडक्ट्सच्या जाहिरातीदेखील केल्या.
सना गांगुली यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधून पदवीधर आहे.
सनाने इकोनॉमिक्स आणि फायनान्सचं शिक्षण घेतलंय.
सना आपली आई डोनाप्रमाणे क्लासिकल डान्सर आहे. डोनाने आपल्या लेकीला डान्सचं प्रशिक्षण दिलंय.