भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात इंदूरच्या होळकर स्टेडियमवर दुसरा टी-ट्वेंटी सामना खेळवला जात आहे.
दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने एक मोठा इतिहास रचला आहे.
क्रिकेटच्या इतिहासात 150 टी-ट्वेंटी सामने खेळणारा जगातील पहिला खेळाडू रोहित शर्मा ठरला आहे.
रोहित शर्मानंतर आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगचा नंबर लागतो. त्याने 134 सामने खेळले आहेत.
तर तिसऱ्या क्रमांकावर आयर्लंडचाच जीएच डॉकरेल आहे. त्याने आत्तापर्यंत 128 सामने खेळले आहेत.
पाकिस्तानच्या माजी खेळाडू शोएब मलिक याने एकूण 124 टी-ट्वेंटी सामने खेळले असून तो या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
पाचव्या स्थानावर न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तिलचा आहे. त्याने 122 सामन्यात धुंवाधार खेळी केलीये.