भारतीय क्रिकेट नियामक मंडळामधील निवड समितीचे प्रमुख अजीत आगरकर यांना फिरकीपटू आर. अश्विनने विश्वचषकासंदर्भात एक सल्ला दिला आहे.
अश्विनने तिलक वर्माला वर्ल्ड कप 2023 च्या संघामध्ये स्थान देण्याची मागणी केली आहे. या सल्ल्याच्या माध्यमातून त्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
अश्विनने आपल्या युट्यूब चॅनेलला तिलक वर्माचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
तिलक वर्मा हा अगदी रोहित शर्माप्रमाणे फलंदाजी करतो, असंही अश्विनने म्हटलं आहे.
"तो फार आरामात पूल शॉट खेळतो. प्रत्येक भारतीय खेळाडूला हे जमत नाही," असं अश्विन या व्हिडीओत म्हणाला.
अश्विनने तिलकचा पूल शॉट हा नैसर्गिक शॉट असल्यासारखं वाटतं असंही व्हिडीओमध्ये तिलकच्या खेळाचं विश्लेषण करताना म्हटलं आहे.
तिलकच्या फलंदाजीची शैली ही कोणत्याही पदार्पण करणाऱ्या भारतीय खेळाडूपेक्षा फारच वेगळी आहे, असं अश्विन म्हणाला.
तिलक डावखुरा फलंदाज आहे. भारतीय संघ एका डावखुऱ्या फलंदाजाच्या शोधात असल्याने तिलक हा चांगला पर्याय ठरु शकतो, असा युक्तिवादही अश्विनने केला आहे.
तिलक हा डावखुरा असल्याचा फायदा भारतीय संघाला होऊ शकतो, असा विश्वास अश्विनने व्यक्त केला.