मुंबई इंडियन्स हार्दिक सह 'या' 7 खेळाडूंना देणार नारळ?

Pooja Pawar
Oct 03,2024


आयपीएल 2025 पूर्वी मेगा ऑक्शन पार पडणार असून यासाठी आयपीएल गवर्निंग काउंसिलकडून रिटेंशनच्या नियमांची घोषणा करण्यात आली आहे.


नियमांनुसार प्रत्येक फ्रेंचायझी त्यांच्या टीममधील केवळ 6 खेळाडूंना रिटेन करू शकतात.


आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रेंचायझी मुंबई इंडियन्स कोणत्या 6 खेळाडूंना रिटेन करणार याविषयी चर्चा सुरु असतानाच कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार नाही याविषयी सुद्धा बरीच चर्चा आहे.


हार्दिक पंड्याला MI ने आयपीएल 2024 पूर्वी गुजरात टायटन्समधून ट्रेड करत आपल्या संघात घेतले होते. त्यानंतर रोहितकडून कर्णधारपद काढून घेत हार्दिककडे MI चे नेतृत्व सोपवण्यात आले.


परंतु मागचा सीजन हा हार्दिकसाठी खूप वाईट ठरला होता. त्यामुळे अनेक दिग्गजांच्या मते मेगा ऑक्शनपूर्वी फ्रेंचायझी हार्दिकला रिटेन करण्याची शक्यता फार कमी आहे.


ईशान किशन मागील अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्ससाठी खेळतोय. परंतु यंदा बुमराह आणि सूर्यकुमारला फ्रेंचायझी प्राथमिकतेने रिटेन करेल. तेव्हा ईशान किशनला MI रिलीज करू शकते.


पीयूष चावला हा मागील अनेक वर्षांपासून MI साठी खेळतोय. आयपीएल 2022 आणि 2023 मध्ये एकूण 35 विकेट्स घेतले होते. मात्र फक्त 6 खेळाडूंना रिटेन करण्याची अट असल्यामुळे पीयूषला MI रिलीज करू शकते.


ऑल राउंडर खेळाडू मोहम्मद नबी याला मागील सीजनमध्ये 7 सामने खेळण्याची संधी मिळाली होती. ऑक्शनपूर्वी नबी सुद्धा रिलीज होऊ शकतो.


ऑल राउंडर रोमारियो शेफर्ड याला मुंबई इंडियन्स रिटेन करेल याची शक्यता कमी आहे. काही सामने वगळल्यास त्याचा परफॉर्मन्स काही खास राहिला नाही.


मुंबईकडे ईशान किशन आणि विष्णू विनोद असे दोन विकेटकिपर आहेत. मात्र विष्णू विनोदला MI कडून खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. तेव्हा यंदा त्याला संघ बाहेरचा रस्ता दाखवणार हे निश्चित आहे.


श्रेयस गोपाल हा मुंबई संघातील एक चांगला स्पिनर आहे. परंतु ऑक्शनचे नियम पाहता MI त्याला रिलीज करू शकते.

VIEW ALL

Read Next Story