पंजाबच्या आक्रमक बॉलिंगसमोर दिल्ली डेअरडेव्हिल्सने केवळ 17.1 षटकात 67 धावांच्या तुटपुंज्या धावसंख्येवर समाधान मानलं. किंग्ज इलेव्हन पंजाबने सहज लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या 7.5 षटकांत 10 विकेट्स राखून सामना जिंकला.
मुंबई आणि दिल्लीच्या सामन्यात फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने 212 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना दिल्लीचा संघ 13.4 षटकात केवळ 66 धावांवर गारद झाला.
रॉयल्सने जयपूर येथे 172 धावांचा पाठलाग करताना आरआरचा संघ केवळ 59 धावांवर बाद झाला. आजच्या सामन्यात राजस्थानचं वस्त्रहरण झालंय.
बंगळुरूच्या संघाने दिलेल्या 133 धावांचा पाठलाग करताना राजस्थान 18 षटकांत फक्त 58 धाव केल्या आणि डाव आटोपला होता. आरसीबीने हा सामना 75 धावांनी सामना जिंकला होता.
कोलकाता आणि बंगळुरू यांच्यातील 23 एप्रिल 2017 रोजी सामन्यात आरसीबीचा संघ 9.4 षटकात फक्त 49 धावांवर बाद झाला, जो IPL इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या आहे.
पाहा एका क्लिकवर!