ऋतुराज गायकवाडला पहिल्या क्रमांकावर फळंदाजीला पाठवलं जाऊ शकतं.
डेवॉन कॉनवे जखमी असल्याने त्याच्या जागी रचिन रवींद्र ओपनिंगला येऊ शकतो.
अजिंक्य रहाणेने गतवर्षी चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे त्याला यावर्षीही संघ व्यवस्थापन पाठिंबा देऊ शकतं.
डेरेल मिशेल याला संघाने 14 कोटीत विकत घेतलं होतं. त्याला मधल्या फळीत संधी दिली जाऊ शकते.
टी-20 वर्ल्डकपमध्ये स्थान मिळवण्यासाठी इच्छुक असणारा शिवम दुबे चांगली कामगिरी करण्याची आशा आहे.
अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा संघसाठी सर्वात महत्वाच्या खेळाडूंपैकी आहे.
महेंद्रसिंग धोनी आपला अखेरचा आयपीएल हंगाम खेळणार की नाही याची चाहत्यांना प्रतिक्षा आहे.
संघाने 4 कोटीत विकत घेतल्यानंतर शार्दूल ठाकूर संघात परतला आहे.
नव्या चेंडूसह उत्तम कामगिरी करणारा दीपक चहर संघाला मोठं यश मिळवून देऊ शकतो.
रहस्यमयी फिरकी गोलंदाज महेश चेन्नईसाठी महत्त्वाचा खेळाडू असणार आहे.
गतवर्षी तुषार देशपांडे 21 विकेट्स घेत सर्वोत्तम गोलंदाज ठरला होता.
गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये दोन्हीकडे मोईन अली संघासाठी सर्वोत्तम राखीव खेळाडू आहे.