हा वाद 19 व्या ओव्हरमध्ये झाला जेव्हा थर्ड अंपायरने आवेश खानच्या चेंडूला नो-बॉल देण्यास नकार दिला होता.
प्रेरक लाँग ऑनवर फिल्डिंग करत होता, तेव्हा हा हल्ला झाला. नट-बोल्टमुळे तो जखमी झाला होता.
जॉन्टी रोड्सने हा हल्ला त्यांचा खेळाडू प्रेरक मांकड याच्यावर झाला असून, त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याचं सांगितलं आहे.
पण लखनऊ संघाचा फिल्डिंग कोच जॉन्टी रोड्स याने डगआऊटमध्ये हा हल्ला झाला नव्हता असं सांगितलं आहे.
यादरम्यान, नाराज चाहत्यांनी लखनऊ संघाच्या डगआऊटवर नट-बोल्ट फेकून हल्ला केला.
या सामन्यात नो-बॉलवरुन वाद पाहायला मिळाला. यावरुन हैदराबाद संघाचे चाहते संतापले होते.
या सामन्यात निकोलस पूरनने 13 चेंडूत 44 धावा ठोकल्या. प्रेरक मांकडने 45 चेंडूत 64 धावा केल्या.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये शनिवारी लखनऊ सुपरजायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला.