रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज झालीय. 8 ऑक्टोबरला भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवला जाणार आहे.
अक्षर पटेल दुखापदग्रस्त झाल्याने टीम इंडियात अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनला संधी मिळाली. याआधी अश्विन 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळला होता.
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या 37 वर्षांच्या अश्विनने स्पर्धेपूर्वी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ही शेवटची वर्ल्ड कप स्पर्धा असू शकते असं अश्विनने म्हटलंय.
गेल्या काही वर्षात क्रिकेट कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले, पण आता आपण या गोष्टीचा विचार करत नाही. आता फक्त खेळाचा आनंद लुटायचा असं अश्विनने एका मुलाखतीत म्हटलंय.
इतकंच काय तर भारतासाठी खेळणारी ही शेवटची टुर्नामेंटही असू शकते असंही अश्विनने म्हटलंय. त्यामुळे अश्विन लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सन्यास घेणार असल्याचं बोललं जातंय.
विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियात निवड केल्याबद्दल अश्विनने कर्णधार रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटचे आभार मानले आहेत.
टीम इंडियाच्या कसोटी संघात अश्विनचं स्थान पक्क आहे. पण मर्यादित षटकांच्या सामन्यात अश्विनला सातत्याने आत-बाहेर केलं जातं.