विश्वचषक स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. एशिया कप स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ऑलराऊंडर अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला आहे. अक्षर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला एशिया कपसाठी संघात संधी देण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडच्या डाव्या खांद्याला जबर चेंडू लागला. ही दुखापत इतकी गंभीर होती की त्याला मैदान सोडावं लागलं. हेड दुखापतीतून सावरु शकला नाही तर मार्नस लाबूशेनला संघात संधी मिळू शकते.
ऑस्ट्रेलियाच्या दुखापतग्रस्त खेळाडूंमध्ये स्टिव्ह स्मिथचाही समावेश आहे. स्मिथच्या डाव्या मनगटला दुखापत झाली आहे. दुखापतीमुळे गेल्या चार आठवड्यापासून तो मैदानाबाहेर आहे. भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत स्मिथ संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कही दुखापतीशी लढा देतोय. अॅशेस मालिकेनंततर मिचेल स्टार्कला खांदा आणि कमरेच्या दुखापतीचा सामना करावा लागतोय. स्मिथप्रमाणेच स्टार्क भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुनरामन करण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी विश्वचषक स्पर्धेत खेळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात फिल्डिंग करताना साऊदीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला जबर दुखापत झाली होती.
श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज महीष तिक्षणा हॅमस्ट्रिंग इंजुरीमुळे एशिया कपच्या फायनलमध्ये खेळू शकणार नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात फिल्डिंग करताना त्याच्या हाताला दुखापत झाली.
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराला लंका प्रीमिअर लीग स्पर्धेदरम्यान खांद्याला दुखापत झाली. दुखापतीमुळे संपूर्ण एशिया कप स्पर्धेला त्याला मुकावं लागलं.
श्रीलंकेचा स्टार ऑलराऊंडर वानिंदु हसारंगाही दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत आहे. दुखापीतमुळे संपूर्ण एशिया कप स्पर्धेला त्याला मुकावं लागलं. विश्वचषक स्पर्धेपूर्वी दुखापीतून तो सावरतो की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही
विश्वचषक स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघालाही मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज नसीम शाह दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर गेला आहे. एशिया कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती.
पाकिस्तानचा आणखी प्रमुख वेगवान गोलंदाज हारिस रौफ जखमी झाला आहे. एशिया कप स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात रौफच्या खांद्याला दुखापत झाली. विश्वचषकापूर्वी रौफ दुखापतीतून सावरेल असा विश्वास कर्णधार बाबर आझमने व्यक्त केला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्किया स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका खेळू शकला नाही. विश्वचषकापूर्वी नॉर्किया तंदरुस्त होईल असं साऊथ आफ्रिका क्रिकेट बोर्डाने म्हटलंय.
ऑस्ट्रेलिचा कॅप्टन पॅट कमिंसच्या मनगटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे साऊत आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून त्याला बाहेर बसावं लागलं. भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कमिंस पुनरामन करण्याची शक्यता आहे.