त्यामुळे या तिकिटाचं कोणाताही रिफंड दिला जात नाही. सामना दोन दिवसात किंवा तीन दिवसात संपला तरी प्रेक्षकांना त्यांचे पैसे परत मिळत नाहीत.
राज्य क्रिकेट असोसिएशनतर्फे शक्यतो सामन्याचं सिझन तिकिटाची विक्री केली जाते. सिझन तिकिटाचा अर्थ असा आहे की या एका तिकिटावर पूर्ण पाच दिवसांचा सामना पाहाता येतो.
सामना दोन किंवा तीन दिवस संपत असल्याने चाहत्यांची जास्त निराशा होते. प्रेक्षकांनी पूर्ण पाच दिवसांच्या सामन्यांचं तिकिट काढलं असतं आणि त्यादृष्टीने त्यांनी प्लानिंगही केलं असतं. त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की ज्या प्रेक्षकांनी पाच दिवसांचं तिकिट काढलं आहे त्यांना उर्वरित दिवसांचे पैसे परत मिळतात का?
दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लिओनने तब्बल आठ विकेट घेतल्या. भारताची पहिली इनिंग 109 धावांवर तर दुसरी इनिंग 163 धावात आटोपली. भारताचे दिग्गज फलंदाज नॅथनच्या फिरकीसमोर फ्लॉट ठरले
घरच्या मैदानावर खेळणाऱ्या टीम इंडियाचा सपशेल धुव्वा उडाला आहे. ऑस्ट्रेलियासाठी विणलेल्या फिरकीच्या जाळ्यात टीम इंडियाच अडकली.
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान इंदूरच्या होळकर स्टेडिअमवर तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. पण हा कसोटी सामना पहिल्या तीन दिवसात संपण्याची चिन्ह आहेत