फुटबॉल स्टार नेमारला सोमवारी आग्नेय ब्राझीलमधील समुद्रकिनारी असलेल्या बंगल्याच्या बांधकामादरम्यान पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावला आहे
नेमारच्या या कृतीसाठी त्याला 16 दशलक्ष रियास ($ 3.33 दशलक्ष, अंदाजे 27.27 कोटी रुपये) दंड ठोठावण्यात आला आहे.
नेमारचा लक्झरी व्हिला बनवताना त्याच्या ठिकाणाहून स्वच्छ पाण्याचे स्रोत, दगड आणि वाळू काढून टाकण्यात आली. ज्याची तक्रार स्थानिक प्रशासनाने गेल्या महिन्यात केली होती.
3 जुलै 2023 रोजी प्रशासनाने केलेल्या तपासणीनंतर हे आरोप सिद्ध झाले. मात्र, नेमारच्या प्रवक्त्यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य करण्यास नकार दिला.
ब्राझीलच्या रिओ दि जानेरो राज्याच्या दक्षिण किनार्यावरील मंगरातिबा या शहरात नेमारचा हा बहुचर्चित बंगला आहे.
या दंडाव्यतिरिक्त, स्थानिक ऍटर्नी जनरल कार्यालय, राज्य नागरी पोलिस आणि पर्यावरण संरक्षण कार्यालयासह इतर पर्यावरण नियंत्रण संस्थांद्वारे प्रकरणाची चौकशी केली जाईल.
गेल्या महिन्यात अधिकाऱ्यांनी नेमारच्या या आलिशान व्हिलाला घेराव घालत काम बंद पाडण्याचे आदेश दिले होते.
प्राधिकरणाशिवाय नदीचे पाणी वळवणे' आणि दगड काढून टाकणे आणि परवानगीशिवाय वनस्पतींचे हटवणे असे आरोप नेमारवर लावण्यात आले होते. (सर्व फोटो - Reuters)