अशी कामगिरी करणारा पहिलाच इंग्रज!
नेदरलँडविरुद्ध इंग्लंडसाठी स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने ८४ चेंडूत १०८ धावांची शानदार खेळी केली. त्याने केवळ ६ षटकार आणि ६ चौकार मारले.
स्टोक्सचे हे विश्वचषक इतिहासातील पहिले शतक आहे. आपल्या शानदार खेळीने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला.
नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १० हजार धावा पूर्ण केल्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा आणि 200 बळी घेणारा स्टोक्स हा इंग्लंडचा पहिला आणि जगातील 12 वा खेळाडू ठरला आहे.
आधी स्टीव्ह वॉ, कार्ल हूपर, सचिन तेंडूलकर, सनथ जयसूर्या, जॅक कॅलिस, शाहिद आफ्रिदी, ख्रिस गेल, शोएब मलिक यांसारख्या दिग्गजांनी ही कामगिरी केली होती.
त्याचबरोबर शेन वॉटसन, मोहम्मद हाफीज आणि शकीब अल हसन या खेळाडूंचा देखील समावेश आहे.