चुकूनही 'या' 4 लोकांच्या पायाला स्पर्श करू नका
भारतीय संस्कृतीत ज्येष्ठ नागरिकांच्या पायाला स्पर्श करुन त्यांचा आशीवार्द घेतला जातो. वर्षांवर्षापासून ही परंपरा आजही अखंड चालू आहे.
सनातन धर्मात पायाला स्पर्श करुन नमस्कार करण्याबद्दल नियम सांगण्यात आले आहेत. त्यानियमानुसार काही व्यक्तीच्या चुकूनही पाया पडू नयेत.
सनातन धर्मानुसार अशी चूक केल्यास तुम्हाला पाप आणि अशुभ परिणाम भोगावे लागतात.
मंदिरात कधीही ज्येष्ठ किंवा आदरणीय व्यक्तीच्या पाया पडू नये. कारण मंदिरात देवापेक्षा मोठं कोणी नसतं.
झोपलेल्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करुन नमस्कार करु नका. कारण शास्त्रानुसार त्या व्यक्तीचे वय कमी होतं.
शास्त्रानुसार झोपलेल्या व्यक्ती म्हणजे फक्त मृत व्यक्तीच्या पायांना स्पर्श करुन नमस्कार करता येतो.
कोणीही अंत्यसंस्कार विधीतून परतलेल्या कुठल्याही व्यक्तीच्या पाया पडू नयेत. त्याने आंघोळ केल्यावर तुम्ही पायांना स्पर्श कगरुन नमस्कार करु शकता.
हिंदू धर्मात मुलगी, भाची, नात किंवा पणती यांनी ज्येष्ठ नागरिकांना पायांना स्पर्श करु नमस्कार करु नका. त्या सर्व देवीचं बालरुप असतं. भारतीय संस्कृतीनुसार त्या पूजनीय असतात.
हिंदू धर्मात अनेक चांगल्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. पण बदलत्या काळानुसार त्यातील कुठल्या गोष्टी योग्य आणि अयोग्य हे मान्य करणे हा ज्याचा त्याचा विषय आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)