पती- पत्नीच्या नात्यात कलह नकोय? वापरा 'या' Vastu Tips
वैवाहिक जोडप्यांसाठी वास्तूला जपणं तितकंच महतत्वाचं. चला पाहूया सुखी वैवाहिक आयुष्यासाठीचे वास्तू नियम.
घरात सहसा धातूचे बेड नसावेत. त्यामुळं पती- पत्नीच्या नात्यात मतभेद निर्माण होतात. घरातील बेडवर एक गादी आणि सौम्य रंगाच्या चादरी असाव्यात.
वास्तूच्या नियमांनुसार पत्नीनं कधीच पतीच्या डाव्या बाजूला झोपू नये. अशानं नात्यातील बंध कायम टिकून राहतील.
घरात बेडच्या अगदी समोरच आरसा येणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा वैवाहिक नात्यावर ताण येईल. शिवाय आरोग्याच्या समस्याही भेडसावतील.
देवतांचे फोटो किंवा घरातील मृत व्यक्तींचे फोटो बेडरूममध्ये अजिबात लावू नका. ही बाब कायम लक्षात ठेवा.
घरातील खोल्या आणि विशेष म्हणजे बेडरूम कायमच चौकोन किंवा आयताकृती असावा. इतर कोणत्याही आकारात तो नसेल याची काळजी घ्या.
घरात बेड किंवा बेडरूम कायम दक्षिणेला किंवा प्राधान्यानं दक्षिण पश्चिमेला असावा. पण, या दोन्ही दिशांच्या मध्ये नसावा. अन्यथा नात्यात तणाव निर्माण होईल.
घरासोबतच बेडरूमचे रंग कायमच सौम्य असावेत. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला सकारात्मकता जाणवून देणारे असावेत.
एक बाब कायम लक्षात ठेवा की, घरातील उत्तर पूर्व कोपरा कायम मोकळाच ठेवा. घरात झाडं लावायची झाल्यास ती, दक्षिण पश्चिमेलाच लावा. ज्यामुळं वैवाहिक आयुष्यात सुखाची आणि सकारात्मकतेची बरसात होते.