दिवा लावताना दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी याचे देखील नियम आहेत.
देवासमोर दिवा लावताना तो विझला तर, अशुभ संकेत मानले जाते. अशावेळस देवाची आणि दिव्याची क्षमायाचना करून तो पुन्हा प्रज्वलित करावा.
दक्षिण ही यमाची दिशा आहे. यामुळे कधीच दिव्याची वात दक्षिण दिशेला नसावी.
दिव्याची वात पश्चिम दिशेला असल्यास अडचणी येवू शकतात.
घरातील सदस्य वारंवार आजारी पडत असल्यास दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवावी.
धनलाभासाठी दिव्याची वात उत्तर दिशेला असावी.
तेलाचा दिवा डाव्या बाजूला तर तुपाचा दिवा उजव्या बाजूला लावावा.