अनेकजण आपल्या तक्रारी घेऊन वृंदावनच्या प्रेमानंद महाराजांकडे जात असतात.
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली आपल्या मुलांसह त्यांना भेटायला गेले होते.
अनेक भक्त प्रेमानंद महाराजांना श्रीमंत होण्याचा आणि संकटावर मात करण्याचा मार्ग विचारत असतात.
यासाठी प्रेमानंद महाराज भक्तांना ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास सांगतात. त्यांच्या मते, परिश्रमाने माणूस भगवंताला प्रसन्न करतो. मग त्याला हवे ते साध्य करता येते.
त्यांच्या मते, अशी कोणतीच गोष्ट नाही जी कठोर परिश्रमामुळे साध्य करू शकत नाही. जर तुम्ही प्रामाणिकपणे ध्येयाकडे वाटचाल केल्यास नक्कीच यश प्राप्त होते.
तसेच श्रीमंत होण्यासाठी सत्कर्म, नामस्मरण, गरीबांना मदत केली पाहिजे. यामुळे देव प्रसन्न होतात आणि तुमची मनोकामना पूर्ण होते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)