Mangal Gochar 2023

मंगळ सिंह राशीत प्रवेश, 'या' 8 राशींना देणार अपार धन?

18 ऑगस्टपर्यंत अच्छे दिन

शक्ती, धैर्य, शौर्यचा कारक मंगळ सिंह राशीत विराजमान झाला आहे. त्यामुळे काही राशींच्या नशिबात 18 ऑगस्टपर्यंत अच्छे दिन आले आहेत. 18 ऑगस्टला दुपारी 04:12 वाजता मंगळ सिंह राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करेल.

मेष

मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. परदेशात जाण्याचे योग आहे. स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त होईल.

वृषभ

नोकदार वर्गाने कामाच्या ठिकाणी शत्रूपासून सावध राहावे. वैवाहिक जीवनात तणाव राहिल. आरोग्याकडे लक्ष द्या.

मिथुन

या राशींना मंगळ गोचरमुळे फायदा होणार आहे. धनलाभासोबत व्यवसात फायदा होईल. तुमचं भाग्य उजळणार आहे.

कर्क

या राशीच्या आयुष्यात वादाची ठिणगी पडेल. राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वडिलोपार्जित व्यवसायातून फायदा होईल.

सिंह

समाजात मान सन्मान वाढेल. नवीन कुठलाही व्यवहार करु नका. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. वैवाहिक जीवनात तणाव असेल.

कन्या

आर्थिक चणचण जाणवणार आहे. कुटुंबात मतभेद होईल. कार्यक्षेत्रात मेहनत करुनही त्याचे फळ मिळणार नाही.

तूळ

व्यवसायांसाठी मंगळ गोचर भाग्यशाली ठरणार आहे. नोकरदारांची पगारवाढ होणार आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीतून लाभ होईल.

वृश्चिक

मंगळ गोचर या राशीसाठी कठीण काळ घेऊन आला आहे. कामात अडथळे येणार आहे. पदोन्नतीची शक्यता कमी आहे. जोडीदारासोबत निवांत क्षण घालवाल.

धनु

परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल. वडिलोपार्जित मालमत्तेची समस्या दूर होणार आहे. वाहन, घर खरेदीचे योग आहे.

मकर

व्यावसायिकांनी काळजीपूर्वक गुंतवणूक करा. वाहन जपून चालवा. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. घरातमध्ये वादविवाद होण्याची शक्यता आहे.

कुंभ

सरकारी नोकरी आणि व्यवसायिकांसाठी अच्छे दिन असणार आहे. वादाचे निर्णय तुमच्याकडून लागेल. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

मीन

या राशीसाठी मंगळ गोचर शुभ ठरणार आहे. प्रमोशन होणार आहे. घरात आनंदाचं वातावरण असणार आहे. 18 ऑगस्ट पर्यंत नशीब तुम्हाला साथ देणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story