गुरुपौर्णिमेच्या दिवशी करा 'हे' उपाय, कायम होईल धनवर्षाव
आषाढ शुक्ल पौर्णिमा म्हणजे व्यास पूजन, गुरुपूजन याचा अर्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते
3 जुलैला गुरुपौर्णिमा देशभरात साजरी होणार आहे. आर्थिक प्रगतीसाठी उपाय केल्यास फायदे होतील.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरीब लोकांना अन्न आणि कपडे दान करा.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून आधी गुरुरूपी आई वडिलांना साष्टांग नमस्कार करा.
या दिवशी मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घ्यावे आणि त्यांना भोग अर्पण करावे.
गुरुपौर्णिमेला श्री रामचरित मानस, श्री मद्भागवत गीता किंवा अन्य कोणताही धार्मिक ग्रंथाची पूजा करा.
गायीला पोटभर चारा खाऊ घाला आणि नकळत झालेल्या चुकांची माफी मागा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)