ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या कुंडलीवरून तिच्या स्वभावाचा जसा अंदाज लावता येतो, त्याचप्रमाणे राशीनुसार व्यक्तीला भविष्यात कोणते आजार होऊ शकतात याचा ही अंदाज बांधता येतो. चला तर जाणून घेऊयात कोणत्या राशीच्या व्यक्तीला कोणते आजार होऊ शकतात.
मेष राशीचा स्वामी हा मंगळ ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्ती मंगळासारख्या कणखर असतात. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या व्यक्तींना पित्ताचा त्रास होण्याची शक्यता असते.
वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र असल्या कारणाने या व्यक्ती दिसायला आकर्षक असतात. या राशीच्या व्यक्तींना डोळ्यांचे आजार आणि वाताचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते.
मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध हा बुद्धीची देवता मानली जाते, त्यामुळे ही माणसं प्रचंड ज्ञानी असतात. या राशीच्या व्यक्तींना टायफॉईड, न्यूमोनिया,कावीळ हे आजार होण्याची शक्यता असते.
राशीचा स्वामी चंद्र असल्याने ही माणसं मनाने हळवी असतात. या राशीच्या व्यक्तींना भविष्यात रक्ताशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते.
या राशीचा स्वामी सूर्य असल्याने ही माणसं सूर्यासारखी तेजस्वी असतात. या राशीच्या व्यक्तींना डोकेदुखी,हृदयरोगाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते.
मिथुन राशी प्रमाणे या राशीचा स्वामी हा बुध ग्रह असून यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास यांना पोटाशी संबंधीत आजार होण्याची शक्यता असते.
तूळ राशी ही शुक्राच्या अंमलाखाली येत असून ही कलाकारांची रास मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या माणसांना मुत्राशयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते.
वृश्चिक राशीचा स्वामी हा मंगळ ग्रह असून यांना भविष्यात गुदद्वार, पार्श्वभाग,किडनी यांच्याशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते.
धनु राशीचा स्वामी गुरु ग्रह असून ही माणसं अत्यंत नम्र स्वभावाची असतात. या राशीच्या लोकांना यकृत, चरबी, यासंबंधी आजार उद्धभवतात.
मकर राशीचा स्वामी हा शनी आहे. ही माणसं गुडघेदुखी आणि अस्थमा या आजारांना बळी पडण्याची शक्यता असते.
कुंभ शनीची रास असून ही माणसं प्रचंड मेहनती असतात. या राशीच्या माणसांना भविष्यात गुडघदुखीचा आजार संभवतो.
गुरुच्या अंबलाखाली येणाऱ्या या राशीच्या माणसांना सांधेदुखी आणि नेत्रविकार यांसारखे आजार संभवतात. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, आरोग्यविषयक निर्णयांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)