अनेक जण आयुष्यात अशा काही चुका करतात ज्यांना माफी नसते.
मनुष्याच्या हातून होणाऱ्या काही चुका या चुका नसतात तर ते महापाप असते असं चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे.
वाणी अर्थात शब्द हे सर्वात मोठं हत्यार आहे. यामुळे याचा वापर सांभाळून करावा.
शब्दाने केलेले घाव हे न भरणारे असतात. यामुळे आई वडिलांशी बोलताना शब्द जपून वापरावे.
आई वडिलांशी उद्घटपणे बोलणे, बोलण्याने त्यांना दु:खी करणे हे सर्वात मोठे पाप असल्याचे चाणक्य सांगतात.
आई वडिलांवर शब्दाने अत्यार करणारी त्यांचा अपमान करमारी मुलं आयुष्यात कधीच सुखी होत नाहीत.
मुलांकडून मिळालेली वाईट वागणूक हा आई वडिलांच्या आयुष्यातील सर्वात क्लेशदायक क्षण असतो.