गरीब होऊ शकतो श्रीमंत केवळ या गोष्टींकडे द्या लक्ष

कोणावर प्रसन्न होते लक्ष्मी आणि कोणच्या वाट्याला कधीच येत नाही दु:ख? काय सांगतात चाणक्य पाहा...

Swapnil Ghangale
Jul 18,2023

चाणक्य नीतिचं पालन करा

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आणि यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी चाणक्य यांच्या नीतिचं पालन करणं आवश्यक आहे.

श्रीमंत होण्यासाठी काय करावं?

चाणक्य नीतिचं पालन केलं तर तुम्ही नक्कीच श्रीमंत व्हाल असं सांगितलं जातं. श्रीमंत होण्यासाठी काय करावं याबद्दल चाणक्य काय सांगतात हे पाहूयात...

अशा लोकांवर लक्ष्मी प्रसन्न होते

यशस्वी होण्याचं पहिलं सूत्र म्हणजे कामाबद्दल प्रामाणिक राहणं. जे लोक कष्ट करतात त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते असं चाणक्य सांगतात.

असे लोक गरिबीमधून लवकर वर येतात

संकटाच्या काळात लोक भटकतात आणि मार्ग चुकतात. तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची मेहनत कठीण काळातही वाया जात नाही. असे लोक गरिबीमधून फार लवकर वर येतात.

या लोकांवर प्रसन्न असते लक्ष्मी

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, आपल्या जबाबदाऱ्या योग्यपणे पार पडाणार कधीच अयशस्वी होत नाही. अशा लोकांवर लक्ष्मी कायम प्रसन्न असते. अशा लोकांवर कुबेराचीही कृपा असते.

गर्व करु नका

व्यक्तीचे कर्मच हेच त्याच्या भल्यासाठी किंवा वाईटासाठी कारणीभूत असतात. मात्र चांगल्या वेळी कधीच पदाचा, पैशाचा गर्व करता कामा नये. असं करणारे लोकच रस्ता चुकतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

त्याचं आयुष्य फार आनंदी

चांगल्या काळातही विनम्र राहणाऱ्या व्यक्तींना कधीच दु:ख होत नाही. त्याचं आयुष्य फार आनंदी असतं असं चाणक्य म्हणतात.

2 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या?

आपली भाषा आणि व्यवहार या दोन्ही गोष्टी व्यक्तीचं यश आणि अपयश ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असं चाणक्य नीति सांगते.

भाषेवर नियंत्रण हवं अन् या गोष्टींची काळजी घ्या

आपल्या भाषेवर आपलं नियंत्रण हवं. तसेच आपल्या व्यवहारामुळे कोणाला मानसिक, शारीरिक किंवा आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी असं चाणक्य म्हणतात.

सर्व कामांमध्ये मिळतं यश

आपल्या लक्ष्याप्रती प्रत्येकाने एकाग्र असणं गरजेचं आहे. लक्ष्य साध्य करण्यासाठी यामुळे मदत मिळते. सर्व कामांमध्ये लगेच यश मिळत, असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

VIEW ALL

Read Next Story