Budget 2025: कर आकारताना मधमाशांचा आदर्श ठेवा, कारण...; चाणक्यने का दिलेला सल्ला?

Swapnil Ghangale
Feb 01,2025

गरजांची पूर्तता

कर आणि सवलतींच्या माध्यमातून प्रत्येक देश आपआपल्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो.

आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न

आर्थिक दृष्ट्‍या कमकुवत असलेल्यांना सूट दिली जाते तर आर्थिक सधन व्यक्तींवर करांचा बोजा लादून आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो.

अनेक शतकांपासून हीच भूमिका

जगभरामध्ये मागील अनेक शतकांपासून आर्थिक प्रशासनाची हीच दुहेरी भूमिका राहिली असून यावर देशाचा आर्थिक विकास अवलंबून असतो.

मार्गदर्शकं तत्वं

महान अर्थशास्री असलेल्या चाणक्य यांनाही राजाने कर कसा असावा याबद्दलची मार्गदर्शकं तत्वं सांगितलेली. ते काय म्हणालेले पाहूयात...

या गोष्टी राजाला जमल्या पाहिजेत

जे आपल्याकडे नाही ते या करातून प्राप्त करणे, जे आहे ते सुरक्षित करणे आणि जे सुरक्षित आहे हे योग्य पद्धतीने वाटणं राजाला जमलं पाहिजे असं चाणक्य म्हणाले.

सर्वांच्या गरजा लक्षात घेणं गरजेचं

समाजातील सर्व वर्गांच्या गरजा राजाने लक्षात घेणंही गरजेचं असल्याचं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

हे पापच

समाजातील कोणत्याही वर्गाकडे दुर्लक्ष करणं हे राजाने केलेल्या पापासमान आहे, असंही चाणक्य म्हणालेत.

राजाच्या जागी सरकार

आजच्या युगाचा विचार केला तर राजाच्या जागी सरकारला ठेवता येईल. सर्व वर्गांच्या हितांसाठी समानतेने विचार करुन निर्णय घेणं सरकारचं कर्तव्य आहे.

मधमाशांचा आदर्श घ्यावा

राजाने मधमाशांकडूनही कर आकारण्याचं कौशल्य शिकलं पाहिजे. फुलांच्या परागकणांचं वहन करण्याच्या मोबदल्यात मधमाशा त्यांच्यामधील मधूर रस शोषून घेतात.

असं कर धोरण का असावं?

मधमाशांनी फुलांचा रस शोषून घेतल्याने फुलांना नुकसान नाही तर फायदाच होतो. राज्याचं कर धोरण असेच असावे, असं चाणक्य यांनी म्हटलेलं.

VIEW ALL

Read Next Story